महाराष्ट्रराजकारण

सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री- प्रवीण दरेकर

सध्या कोरोनामुळे सर्व देश ठप्प आहे. यातच राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

कोरोना हा महाभयंकर रोग असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री बाहेर पडत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, असं दरेकर म्हणाले आहेत.

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातलं. पूर्ण कोकण उध्दवस्त झालं. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत, असेही प्रवीण दरेकर म्हटले.