महाराष्ट्रराजकारण

मध्यरात्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली- जयंत पाटील

Newslive मराठी-  मुंबईच्या बांद्रा-कुर्ला काँप्लेक्समधील (बीकेसी) एका हॉटेलमध्ये मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुपचूप भेट घेतली, असा खळबळजनक दावा राष्ट्र्वादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांनी केला.

भाजपा-शिवसेनेत दररोज वाकयुद्ध सुरू होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यंमंत्र्यांना लपूनछपून भेटण्याची अशी काय गरज पडली. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर अमित शहांची त्यांच्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत्तच झाली नसती. असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, हॉटेलवर झालेल्या भेटीदरम्यान या दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचेही पाटील यांनी राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तनाचा रॅलीमध्ये सांगितले.