महाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगनाच्या आला अंगलट; तक्रार दाखल

कंगनाला रणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणे महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना वकील नितीन माने यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख या अभिनेत्रीने केला असून त्यांचे फिल्ममाफियांसोबत संबंध असल्याचे स्पष्टीकरण व्हिडीओद्वारे दिले असून ते ठाकरे यांची बदनामी करणारे आहे. याबाबत अब्रुनुकसानीचा दावा करण्याबाबत विक्रोळी कोर्टात खटला सुरु होईल.

मी विक्रोळी कोर्टात जाणार आहे. नंतर कोर्ट ज्या प्रमाणे आदेश देईल त्यानंतर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल होईल. सध्या अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याचे माने यांनी सांगितले आहे. हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी देखील कंगनावर जोरदार टीका केली. मुंबईबद्दल केलेले वक्तव्य कंगनाच्या चांगलेच अंगलट येत आहे.