महाराष्ट्र

उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार

Newslive मराठी-  येत्या बुधवारपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहे. मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

९ जानेवारीपासून उद्धव ठाकरे मराठावाडा, विदर्भातील दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर  जाणार आहेत. फक्त दौराच नव्हे तर दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना मदत मोहीमही राबवणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पावसाने ओढ दिल्यानेत ऐन हिवाळ्यात मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. पाण्याअभावी शेतातील पिकं करपली आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा होतोय.