बातमीमहाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी गँगच्या सदस्याची तळोजा कारागृहात आत्महत्या

Newslive मराठी-  अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी गँगमधील 36 वर्षीय सदस्याने नवी मुंबईतील तळोजा कारागृहात काल रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

स्वतःच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याला काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. त्यानंतर त्याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पोलीस महानिरिक्षक दीपक पांडे यांनी या घटनेची माहिती दिला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिनेश लक्ष्मण नारकर (वय 36) ऊर्फ दिन्या असे गवळी गँगमधील या मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नीवर धारदार शस्त्राने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला 10 जुलै रोजी कलम 307 कलमांतर्गत एन. एम. जोशी मार्ग येथील पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 20 जुलै रोजी त्याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती

दरम्यान, तळोजा कारागृहाचे पोलीस अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी सांगितलं की, बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील रक्षक गस्तीवर असताना दिनेश नारकर त्याला स्वच्छतागृहात अत्यवस्थ आढळला. त्यानंतर त्याला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा