महाराष्ट्रराजकारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना एम्स रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी अमित शहांची प्रकृती सुधारली असून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं एम्स रुग्णालयाकडून कळविण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती मिळत आहे. 17 ऑगस्टला रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यामुळे त्यांना रात्रीच एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

अमित शहा यांचा काही दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाचा संसर्ग होताच त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर शहा यांनी कोरोनावर मात केली होती. कोरोनावर मात करून घरी गेल्यानंतर शहा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. यामुळे पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं ट्विट केलं. माझी कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो आणि माझ्या प्रकृतीसाठी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली व माझ्या कुटुंबीयांना धीर दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणखी काही दिवस मी होम आयसोलेशन मध्ये राहणार आहे. आस शहा यांनी म्हंटल होत.