कोरोनादेश-विदेशबातमी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

Newslive मराठी- केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. शाह यांनीच स्वता ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे.

आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यांनी माझी तब्येत ठीक आहे असे म्हटले आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया विलगीकरणात राहावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.

तसेच आपली चाचणी करुन घ्यावी’ असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे. दरम्यान अनेक मंत्र्यांच्या संपर्कात अमित शहा आले होते. कोरोनाचा कहर देशात वाढतच चालला आहे. अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी घोषणा केलेल्या 1 कोटी मधला एक रुपया ही आला नाही!

-फडणवीस सरकारने आणलेली आणखी एक योजना ठाकरे सरकारने केली रद्द

-पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते; रावसाहेब दानवेंची शरद पवारांवर कोपरखळी

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi