देश-विदेशमहाराष्ट्र

प्रकृती बिघडल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा रुग्णालयात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली होती. अमित शाह यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

आता अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने ‘एम्स’ मध्ये ऍडमिट केल्याची माहिती आहे. पोस्ट कोव्हिड केअरसाठी शाह यांना ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे. ते स्वस्थ असून रुग्णालयातून कामही करत आहेत असे ‘एम्स’ रुग्णालयाने म्हटले आहे.

अमित शाह यांनी 14 ऑगस्टला स्वत: ट्विटरवर माहिती देत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले. आज माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी परमेश्वराचा आभारी आहे. यादरम्यान ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन असं अमित शाह म्हणाले होते. मात्र आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.