कोरोनामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी यांनी स्वत:चं विलगीकरण केलं असून आपली प्रकृती चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

आतापर्यंत अनेक केंद्रीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अमित शाह आहेत. तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील कोरोना झाला होता त्यामध्ये त्यांचे निधन देखील झाले.

कोरोनाचे रुग्ण आता वाढतच आहेत. राजकीय नेत्यांपासून अनेकांना कोरोना होत आहे. परिस्थिती आता हाताबाहेर जात आहे. अनेकांना बेड देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे आता मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागणार आहे.