महाराष्ट्रराजकारण

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती चिंताजनक  

केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती ढासळली असून चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्यावर फोर्टिस एर्स्कॉर्ट्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पासवान यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला असून मूत्रपिंडही निकामी झाले आहे. पासवान यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. उपचारांना साथ मिळाली पाहिजे असे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे.

पासवान यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पासवान यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पासवान यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास आहे. यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

पासवान यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना डॉक्टर म्हणाले की, पासवान यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. पासवान यांना आधीपासून हृदयविकार असल्याने त्यांचे हृदय कमजोर झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेही शक्य नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शस्त्रक्रिया केली तर ते धोक्याचे ठरेल असेही डॉक्टर म्हणाले.