कोरोनामहाराष्ट्र

अनलॉक- ४ ची नियमावली केंद्रीय ग्रह मंत्रालयाकडून जाहीर

अनलॉक-४ साठीची नियमावली केंद्रीय ग्रह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली. या नियमावलीनुसार देशात ७ सप्टेंबरपासून धावू शकणार आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि मेळावे आयोजित करण्याला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित मेळावे आणि कार्यक्रम २१ सप्टेंबरपासून होऊ शकतील. मात्र त्यामध्ये १०० व्यक्तीच सहभागी होऊ शकतील.

राजकीय, सामाजिक आणि इतर कार्यक्रम, मेळाव्यांना उपस्थित राहणाऱ्यांना फेस मास्क अनिवार्य असेल. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. त्या कार्यक्रम, मेळाव्यांवेळी थर्मल स्कॅनिंग, हात धुण्याची आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागेल.

विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेस ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सबंधित वर्गामधील विद्यार्थी स्वेच्छेने शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊ शकतील.

शाळा आणि महाविद्यालये प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर असणे गरजेचे आहे. त्याशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल. ऑनलाईन वर्ग किंवा टेलिकाउन्सिलिंग आणि संबंधित कामकाजासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची सरकारे 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलावण्याची परवानगी देऊ शकतील.