महाराष्ट्रराजकारण

‘उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही तर सॉफ्ट पॉर्नसाठी प्रसिद्ध’- कंगना राणावत

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणा बोलत होती. माझ्या संघर्षांची थट्टा करणं आणि मी तिकीटासाठी भाजपला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे.

खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही. उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते?, सॉफ्ट पॉर्नसाठी ना?, असं कंगणाने म्हटलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी एबीपी माझाच्या कट्यावर दिलेल्या मुलाखतीत कंगणाला देण्यात आलेल्या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेवरून आणि मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मातोंडकर यांनी कंगणाला फटकारलं होतं. कंगणा राणावत तिच्यावर टीका करणाऱ्या प्रत्येकाला ती उटलून प्रतिक्रिया देत आहे. अशातच तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे.