बातमीमहाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त वडगांवमध्ये ‘वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठान’ने लावली 300 झाडे

Newslive मराठी-  आषाढी वारीच्या मुहुर्तावर पाथर्डी तालुक्यातील वडगांव येथे ‘वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठान’च्या माध्यमातून आज वृक्षारोपण करण्यात आले.

गावातील तरूणांनी सामाजिक हेतूने वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील देवीच्या डोंगरावर तरूणांनी तब्बल 300 झाडे लावली आहेत.

‘निसर्ग वाचला तर माणूस वाचेल’ ही भावना मनात ठेवून गावातील डोंगर हिरवागार करण्याचा वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानचा हेतू आहे. त्याच माध्यमातून आज झाडे लावून सुरूवात करण्यात आलेली आहे. भविष्यात ही डोंगरे हिरवीगार व्हावीत अन् येणाऱ्या पिढीला याचा फायदा व्हावा असं यावेळी बोलतांना तरूणांनी सांगितले.

दरम्यान,  या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी गावातील तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.