बातमीमहाराष्ट्र

वडगांवच्या ‘वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठान’ ने बसवला पर्यावरण पुरक गणपती

Newslive मराठी-  पाथर्डी- वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील वडगांव येथे पर्यावरणपुरक गणपती बसवण्यात आलेला आहे.

वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगांवमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत अनेक कामे सुरू आहेत. यावर्षी प्रतिष्ठानेने गावातील डोंगरावर तब्बल 300 झाडे लावलेले आहेत. त्यामुळे तो निसर्ग संवर्धनाचा वारसा चालवत प्रतिष्ठानने पर्यावरण पुरक गणपतीची स्थापना करून सामाजिक संदेश दिलेला आहे.

जास्वंदी झाडाच्या पानापासून ही प्रतिकृती बनवून झाडांच्या सानिध्यात या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. यावेळी गावातील अनेक तरूण उपस्थित होते.