कोरोनामहाराष्ट्र

कोल्हापूर-सांगलीला व्हेंटिलेटर बेड पुरवणार- अजित पवार

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात चार दिवसात व्हेंटीलेटरसहीत अतिदक्षतेचे बेड पुरवू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना दिले आहे. याबाबतची माहिती शेट्टी यांनी पत्रकारांना दिली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य सरकारने तातडीने या दोन जिल्ह्यांमध्ये लक्ष घालून व्हेंटिलिटरची सुविधा पुरवावी. अशी मागणी राजू शेट्टी यांनी पवार यांच्याकडे केली होती.

येत्या चार दिवसात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात व्हेंटीलिटर सहीत अतिदक्षतेचे बेड पुरवू, असे आश्वासन पवार यांनी दिले असल्याचे शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी म्हणाले सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. व्हेंटिलिटर अभावी रूग्ण दगावत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. तेथील व्हेंटिलिटर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात यावे. तसेच खासगी रूग्णालयातही बेड अपुरे पडत आहेत.

ऑक्सिजनची पातळी खालावल्यास रूग्णांना तातडीने बेड मिळत नाहीत. व्हेंटिलिटर अभावी रूग्ण दगावत आहेत. सांगली जिल्ह्यातील मृत्यू दर सर्वाधिक आहे. गेले दोन दिवस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधतो आहे. यामुळे शेट्टी यांच्या मागणीला यश आले आहे.