मनोरंजनलक्षवेधी

बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Newslive मराठी:  बहुचर्चित अशा ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.

मुंबईत या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची मुख्य भूमिका साकारणारा नवाजुद्दीन सिद्दिकी यांसह अनेक कलाकार आणि राजकीय धुरंदर उपस्थित होते.

नवाजुद्दीनने चित्रपटात बाळासाहेबांची हुबेहूब भूमिका साकारल्याचं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.