आरोग्य मनोरंजन

विद्या बालनला ‘हा’ आजार?

Newslive मराठी-  आपल्या हरहुन्नरी अभिनयाने लाखो चाहत्यांच्या ह्रदयावरआधिराज्य गाजविणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री विद्या बालन अनेक वर्षापासून एका मानसिक रोगाने त्रस्त आहे.

काही दिवसांपूर्वी विद्याने स्वतः सांगितलं होतं की, तिला फार स्वच्छता लागते. स्वच्छतेबाबत ती एवढी जागरुक आहे की तिला ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर (OCD) हा आजार आहे. हा एक मानसिक आजार आहे. या आजारात व्यक्तीला एकच काम सारखं करण्याची इच्छा होते.

हात धुणं, गोष्टी मोजणं, एखादी गोष्ट सारखी तपासणं अशा अनेक गोष्टी या आजाराचे लोक दिवसभरात शेकडोवेळा करतात. या आजारामुळे विद्याला घरात जराही धूळ चालत नाही. ती स्वतः अनेकदा घरात साफसफाई करते. एवढंच नाही तर घरातल्या इतर व्यक्तींच्या चपला घालणंही तिला आवडत नाही. विद्याच्या आजारामुळे तिचे चाहते फार चिंतेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *