महाराष्ट्रराजकारण

कट्टर विरोधक असलेले विजय शिवतारे अजित पवारांच्या भेटीला

कोरोनाच रुग्ण सध्या सर्वत्र वाढतच आहेत. यामध्ये पुरंदर तालुक्यात कोरोनाने मोठी उसळी घेतली असून मृत्यू दरही वाढला आहे. तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी माजी राज्यमंत्री व शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. कोरोनाने तालुक्यात झालेल्या भीषण परिस्थितीची माहिती आपण अजित पवार यांना दिली.

पुरंदरला विविध उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. शिवतारे म्हणाले, माझी किडनी निकामी असल्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मला सार्वजनिक जीवनात जाण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईचा आढावा घेत पालकमंत्री पवार यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आहे. शिवाय योग्य त्या अनेक उपाययोजना सांगितल्या आहेत. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन पुढे लवकरात लवकर हालचाली करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे, सध्या पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.