खेळमहाराष्ट्र

विराट- अनुष्काला रणवीर सिंगने दिल्या खास शुभेच्छा

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या जोडीने सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केल्यापासून त्यांचे चाहते, क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटीज यांनी शुभेच्छांच्या वर्षाव सुरू केला आहे. लवकरच त्यांच्या घरात छोट्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. आता शुभेच्छांमध्ये अभिनेता रणवीर सिंह याने दिलेला एक मॅसेज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

रणवीरने आपल्या स्टाइलमध्ये विरुष्काला शुभेच्छा दिल्या आहे. रणवीरने दोघांनाही वेगवेगळया शुभेच्छा दिल्या आहेत. रणवीरने विराटच्या इंस्टाग्रामवर कमेंट्‌स करत 3 हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. तर दुसरीकडे अनुष्काच्या इंस्टाग्रामवर हार्ट आय इमोजी, इवल आय इमोजी, प्रेयर हॅंड्‌स आणि हार्ट इमोजीसह शुभेच्छा दिल्या आहेत.

या कमेंट्‌सवरून स्पष्ट होते की, रणवीर आणि अनुष्का यांच्यातील मैत्री आजही कायम आहे. हे दोघेजण कधी काळी रिलेशनशिपमध्ये राहिलेले आहेत. त्यावर बऱ्याचवेळा चर्चा देखील सुरू होत्या मात्र आता त्याला ब्रेक लागला आहे. सध्या विराट आयपीएलची तयारी करत आहे.