महाराष्ट्रराजकारण

विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली, पोलिस दलात फेरबदल

राज्य सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नांगरे पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे.

नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत विशेष पोलीस तुरुंग महानिरीक्षकपदी बदली झाली आहे, तर प्रताप दिघावकर यांना नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार कृष्ण प्रकाश यांच्याकडे आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरती सिंह यांची बदली झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात बदलीचे वारे वाहू लागले होते. अखेर या बदल्या करण्यात आल्या. यावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य देखील दिसले होते.