आंतरराष्ट्रीय बातमी लक्षवेधी

व्होडाफोन सेवा कधीही बंद होऊ शकते !

Newslive मराठी- व्होडाफोनची भारतातील सेवा कधीही बंद होऊ शकते, असं वृत्त समोर आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.

व्होडाफोन कंपनीला जून महिन्यात 4 हजार 67 कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. तसेच हा नुकसानीचा आकडा वाढतच असल्याने व्होडाफोनच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.

जिओनं बाजारात उडी घेतल्यानंतर अनेक कंपन्यांचे दाबे दणाणले. कंपनीच पॅकअप झालेलं असून कंपनी कोणत्याही क्षणी भारतातून गाशा गुंडाळणार असल्याचं वृत्त आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे.

त्यातच सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आणि आयडिया कंपनीला 28 हजार 309 कोटी रूपये भरण्यास सांगितले आहेत.

त्यामुळे या कंपनीची वाट बिकट होत चालली आहे. त्यामुळे व्होडाफोन भारतातून आपला गाशा गुंडाळणार, अशी शक्यता आहे.

सनी लिओनी क्रिकेटच्या मैदानात

सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका– संजय राऊत

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

बारामतीत झळकळ्या पुणेरी पाट्या

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *