महाराष्ट्रराजकारण

मतदान करा आणि 1 डझन आंबे मोफत मिळवा

Newslive मराठी- मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज (29 एप्रिल) मतदान करणाऱ्यांना एक डझन आंबे विकत घेतले की त्यावर एक डझन आंबे मोफत मिळणार आहे.

मुंबईतील सर्वच मतदारसंघातील मतदारांसाठी ही ऑफर असणार आहे. मुंबईतील सायन भागातील राजेश शिरोडकर यांनी ही ऑफर ठेवली आहे.

दरम्यान, मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढावा हाच हेतू यामागे आहे.