बारामतीमहाराष्ट्र

बारामतीकरांनो जागे व्हा, गेल्या २४ तासात सापडले ११० रुग्ण

कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढतच आहेत. ग्रामीण भागात देखील कोरोना वाढत आहे. बारामती शहरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल ११० रुग्ण आढळल्याने बारामतीकरांचे धाबे दणाणले आहे. बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. गेल्या तीनच दिवसात जवळपास तीनशे रुग्णांची भर पडली आहे.

आता बारामतीत समूह संसर्ग झाला की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या तपासण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासन म्हणते. मात्र रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ व त्यातही कुटुंबातल्या कुटुंबातच होणारी लागण हा चिंतेचा विषय ठरत आहे. काल बारामतीत आरटीपीसीआरचे १४८ नमुने घेण्यात आले. त्या पैकी ७२ नमुने पॉझिटीव्ह आले.

दुसरीकडे खाजगी प्रयोगशाळेत घेतलेल्या ६३ पैकी २१ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. यामुळे हा आकडा धक्कादायक आहे. सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. रुग्ण वाढत असताना देखील बारामतीमध्ये सर्व दुकाने चालू आहेत.