मनोरंजनमहाराष्ट्र

पाहा ‘धप्पा’ सिनेमाचा ट्रेलर

Newslive मराठी-  धप्पा या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, निपुण धर्माधिकारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. १ फेब्रुवारी २०१९ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘सर्वोकृष्ट चित्रपट’ (राष्ट्रीय एकात्मता ) पुरस्कार मिळाला आहे.  गिरीश पांडुरंग कुलकर्णी लिखित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, ‘धप्पा’ या चित्रपटाचे निर्माते सुमितलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत.

या ट्रेलरमध्ये काही लहान मुले गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर घोळका करून बसल्याचे दिसतात. याबरोबरच तिथे काही भगवे झेंडे, क्रॉस, झाडे दिसत आहेत. तसेच भारत सरकारच्यावतीने आयोजित इंटरनॅशन फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग झाले आहे.