महाराष्ट्रराजकारण

आम्ही जातीचं राजकारण करत नाही- नितीन गडकरी

Newslive मराठी- आमच्या पक्षात जातीचं राजकारण चालत नाही. माणूस जातीनं मोठा होत नाही. त्यामुळेच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीमध्येही आज आमची सत्ता आहे. असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं.

मी जात-पात मानत नाही आणि त्यासाठी कोणी माझ्याकडे आलं, तर त्याला प्रतिसादही देत नाही, असंही गडकरींनी स्पष्ट केलं. भाजपा केवळ उच्च जातीच्या लोकांचा पक्ष असल्याचा भ्रम काँग्रेसनं पसरवला. भाजपामध्ये अस्पृश्यता पाळली जाते, असा अपप्रचार काँग्रेसनं केला. मात्र आम्ही सामाजिक समानता मानतो आणि त्याच धोरणांवर काम करतो. समाजातून जाती प्रथा नष्ट व्हायला हवी.  मी कधीही जाती-धर्माचा विचार करत नाही, असंदेखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, नागपुरातील अनुसूचित समाज कायम भाजपासोबत राहिला. कारण आम्ही जातीचं राजकारण करत नाही, असं गडकरी म्हणाले. अस्पृश्यता संपायला हवी, असं मला वाटतं.