महाराष्ट्रलक्षवेधी

आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

Newslive मराठी- 23 मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. सुरूवातीच्या काळात कोणाला करोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. आज जेव्हा आपण आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थितीत समजते. परंतु आपल्याकडे लॉकडाऊन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असं परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. आपण आता लॉकडाऊन किती काळ चालवणार आहोत. लोकांना आपली नोकरी आहे की नाही याबाबतहबी शंका आता निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

आपल्याकडे पोलीस, डॉक्टर्स, अत्याव्यश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांनी खुपच चांगलं काम केलं. आजची करोनाबाधितांची संख्या प्रश्नचिन्ह निर्माण करत. 130 कोटींच्या देशांच्या आतापर्यंत 13 लाख रुग्ण झाले असं म्हणतो.

काही लोकांचा यात मृत्यू झाला हे दुर्देव म्हणायचं. आपण लॉकडाउन वगैरे किती काळ चालवणार आहोत. आज लोकांकडे आपलं काम आहे की नाही ही शंका आहे. पुण्यात तर दुकानं विक्रीला ठेवलेल्याचं फोटोही मी पाहिले आहेत,” असं राज ठाकरे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मी अनलॉक कधी करणार हे विचारलं होतं. त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. सरकारनं नियमांप्रमाणे दुकानं सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगितली आहेत.

काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे. ते सहा वाजेपर्यंत कामावर आहेत. तर त्यांनी मग सामान घ्यायला कधी जावं. एक दिवस एका फुटपाथवरची दुकानं सुरू ठेवायची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची उघडी ठेवायची. लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी केला नवा खुलासा

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-15 लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन- काँग्रेस