महाराष्ट्रराजकारण

“अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली”

आज विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक होती. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. या निवडणुकीत झालेला पराभव हा भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी थेट अजित पवारांनाच दोष दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, अशी खंतच प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली आहे. यामुळे भाजपची नाराजी दिसुन आली आहे. या प्रकरणामध्ये भाजपने एका रात्रीत अजित पवारांच्या मदतीने सत्ता स्थापन केली मात्र ती टिकली नाही.

आज नीलम गोरे यांची उपसभापतीपदी निवडीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अजित पवार बोलायला उभे राहिले होते. ‘उपसभापती निवडणूक बिनविरोध व्हावे गरजेचे असते, या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात, असे अजित पवार यावेळी म्हणाले.