महाराष्ट्रराजकारण

आमच्यात मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही- संजय राऊत

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये भेट झाली. त्यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. या भेटीमागचे तर्कवितर्क लावले असतानाच या भेटीमागे काय कारण होते ते समोर आले आहे. संजय राऊत यांनी भेटीमागील कारण स्पष्टपणे सांगितलं आहे.

राऊत म्हणाले, काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेता असून माजी मुख्यमंत्रीही आहेत. भाजपाने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.

आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असेही राऊत म्हणाले आहेत. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.