तंत्रज्ञानदेश-विदेशराजकारणलक्षवेधी

समाजात तेढ निर्माण करणा-याना आम्ही ब्लॉक करू, फेसबुक ,युट्युबची उच्च न्यायालयात माहिती

Newsliveमराठी – फेसबुक, यूट्यूबवर वादग्रस्त व्हिडीओसंदर्भात फेसबुक आणि यू ट्यूबनं मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. न्यायालयानं किंवा केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आदेश दिले, तर आम्ही राजकीय पक्षाचं समर्थन करणाऱ्याला ब्लॉक करू शकतो, अशी भूमिका फेसबुक व यूट्यूब न्यायालयात मांडली आहे.

एआयएमआयएमचा समर्थक असलेल्या अबू फैजल नावाच्या व्यक्तीविरोधात मुंबईतील रहिवाशी इम्रान मोईन खान यांनी याचिका दाखल केली आहे. अबू फैजलने दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे व्हिडीओ अपलोड केला असून, त्यांना फेसबुक, यू ट्यूबवर ब्लॉक करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.