महाराष्ट्र

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ठामपणे उभे राहणार- मुंख्यमंत्री

Newslive मराठी-  मराठा समाजासाठी आमच्या सरकारने कधीही अधांतरी निर्णय घेतलेले नाहीत, आरक्षण असो किंवा शिक्षण, रोजगार, आम्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राजकारण आणि समाजकारणात शंकरा प्रमाणे स्वतः विष पचवून अमृत लोकांना द्यावे लागते, मी गेली ४ वर्षे तेच करतोय. मात्र समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी मी पार पाडतच राहीन, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं

दरम्यान, युवकांना बँकांनी कर्जे दिलीच पाहिजेत, बँकांचे काही प्रश्न असतील पण समाजाच्या युवकांसाठी शासन प्रयत्न करीत असून बँकांनी सहकार्य केलेच पाहिजे. यासाठी युवकांनी देखील बँकांवर दबाव वाढविला पाहिजे. असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *