महाराष्ट्रराजकारण

मराठा आरक्षणाच्या लढाईत आम्ही सरकारला सहकार्य करू- देवेंद्र फडणवीस

माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये.

मराठा आरक्षण हे राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईत आम्ही सरकारला सहकार्य करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सरकार मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार आहेत. न्यायालयीन लढाईसाठी तज्ज्ञ वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.