महाराष्ट्रराजकारण

मी काय गुन्हा केला- एकनाथ खडसे

Newslive मराठी- एकनाथ खडसेंना मंत्रीमंडळामधून का बाहेर केलं? नाथाभाऊ गप्प का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. याला एकनाथ खडसेंनी उत्तर दिले.

जयंत पाटील विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांनी प्रश्न विचारणे स्वभाविक आहे. नाथाभाऊ गप्प का, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही.  मी पण उत्तर शोधतो आहे. मी असा काय गुन्हा केला की मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं, सरकार आणि पक्षाकडून मी माहिती घ्यायचा प्रयत्न करतो आहे, असे खडसे म्हणाले.