तंत्रज्ञानलाइफस्टाईल

फास्टॅग काय आहे, कुठे मिळतो आणि कसा वापराला जातो

NEWSLIVE मराठी- फास्टॅग एखाद्या स्टिकरसारखा आहे. कारच्या पुढच्या काचेवर हा टॅग लावावा लागेल. या टॅगच्या मार्फत ‘कॅशलेस’ म्हणजे रोख व्यवहार न करता टोल भरण्याकडे लोकांचा कल वाढवण्याचा प्रयत्न सरकार करतंय.

फास्टॅग मिळवण्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे

– फास्टॅग घेण्यासाठी गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, गाडी मालकाचा पासपोर्ट साईझ फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन्स लागेल.
– कागदपत्रांवरील रहिवासी पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र दाखवावं लागेल.
– जर तुम्ही टोलनाक्यापासून 10 किलोमीटरच्या परिघात रहात असाल तर तुम्हाला टोलमध्ये सूट मिळेल.
– एक फास्टॅग 5 वर्षं वैध असेल.

असा मिळवा फास्टॅग

तुम्हाला जवळच्या नामांकित राष्ट्रीय बँकेत फास्टॅग मिळू शकेल. स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI, HDFC, Axix, कोटक महिंद्रा या बँकांमध्ये फास्टॅग मिळू शकतो. तसेच PayTM, Airtel पेमेंट बँक यासारख्या मोबाईल ऍपवर देखील Fastag उपलब्ध आहे. याशिवाय फास्टॅग ई-कॉमर्स वेबसाईट ऍमेझॉन, फ्लिपकार्टवर देखील मिळू शकतो. तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावरून देखील तो मिळवू शकता.