महाराष्ट्र राजकारण

शस्त्रे वापरून भाजपाला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या?….

Newslive मराठी-  डोंबिवलीतील भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा आज जप्त करण्यात आला. चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी अशी शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली आहेत.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हे शस्त्रे वापरून भारतीय जनता पार्टी ला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. असे जयंत पाटिल म्हणाले .

दरम्यान, भाजपाचे पदाधिकारीच जर अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही. गुंड आणि दहशतवाद्यांची कामे भाजपाचे पदाधिकारीच करू लागले आहेत असे दिसते. येणाऱ्या काळात भाजपा कशाप्रकारे राज्य सांभाळणार आहे हेच यातून पाहायला मिळतं आहे. असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *