महाराष्ट्र

प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? – अजित पवार

Newslive मराठी-  प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे. निवडणुका आल्या की त्यांना प्रभू रामचंद्र आठवतात. अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का ?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला केला आहे.

हनुमानाची आज ‘जात’ काढली जात आहे, पण देवांच्या जाती कशाला काढता, असा सवालही त्यांनी भाजपाला विचारला आहे.  आज गोत्र विचारलं जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का? जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावूक करायचे हाच उद्योग सुरु आहे. आज जाहीर केले ते देता येत नसल्याने आता हे उद्योग सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला.

निवडणुका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलीस शुटिंग करत आहेत. ही काय लोकशाही आहे का? कोणाच्या आदेशावर हे केले जात आहे. आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही परंतू मागच्या दाराने ही आणीबाणी आणली जात आहे, हा भाजपचा डाव असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *