आंतरराष्ट्रीय आरोग्य लाइफस्टाईल

संक्रांतीला तीळ का खातात ?

Newslive मराठी-  थंडीमध्ये म्हणजे संक्रांतीच्या दिवसात तिळगुळ खाण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. थंडीमध्ये बाहेरील तापमान थंड असल्याने शरीराचे तापमान उष्ण राहण्यासाठी तीळ खाल्ले जातात.

थंडीमध्ये रोज थोड्या प्रमाणात तीळ खाल्ल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. तिळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तीळ खाल्ल्याने केस मजबूत होतात. तिळासोबत बदाम आणि खडीसाखर खाल्ल्यास पचनशक्ती वाढते.

आयुर्वेदानुसार, तिळाचं सेवन करणं शक्तिवर्धक आणि प्रभावी आहे. तिळाचे दोन प्रकार असतात. एक सफेद तीळ आणि दुसरे काळे तीळ. जगभरात तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. तिळाच्या तेलात त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवण्यासोबतच उपचार करण्याची गुणवत्ताही आहे.
तिळात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तंतुमय पदार्थामुळे भूक कमी लागते, कारण त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. वेट लॉसच्या डाएटमध्ये तुम्ही तिळाचा समावेश करू शकता. एक चमचा तिळात साधारण ५० उष्मांक मिळतात, त्यामुळे ते प्रमाणातच घ्या. वजन कमी करताना आपल्याला अनेक क्षार किंवा जीवनसत्वे कमी पडू न देणंही तितकंच महत्वाचं आहे.
बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *