महाराष्ट्रलक्षवेधी

प्रवीण तरडे गणपतीच्या सजावटीवरून का झाले ट्रोल; मागितली माफी

राज्यात कोरोना संकटातही सर्वत्र गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झाले. सर्वसामन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. परंतु, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी घरी गणपतीच्या केलेल्या प्रतिष्ठापनेवरून सोशल मीडियावर वाद पेटला आहे. आणि नंतर त्यांना माफी देखील मागावी लागली.

प्रवीण तरडे यांनी यंदा पुस्तक गणपती हा देखावा केला होता. त्यानंतर त्यांनी हे फोटो सोशल मीडियार शेअर केले. पण चाहत्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं. बाप्पाच्या आजुबाजुला पुस्तकांची आरास आहे. पण बाप्पाला संविधानावर विराजमान केलं आहे. याचमुळं अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अखेर त्यांनी व्हिडिओ शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे. आणि त्यांची ती पोस्ट देखील डीलिट केली आहे.

नंतर “माझ्या घरी पुस्तक गणपती अशी कॉन्सेप्ट होती. आणि बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सगळ्यात मोठं प्रतीक अशी माझी भावना होती. परंतु ती किती मोठी चूक आहे, हे माझ्या लक्षात अनेक लोकांनी आणून दिलं,’ असा माफीचा एक व्हिडिओ प्रवीण तरडेंनी फेसबुकवर पोस्ट केला. त्यात ते पुढे म्हणतात, ‘RPI, भीम आर्मी, लातूरची संघटना, पुण्यातल्या अनेक संघटना…मी सर्व माझ्या दलित बांधवांची, ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या, त्या सगळ्यांची जाहीर माफी मागतो. माझी चूक मान्य करतो. आणि मी हा केलेला बदल तुम्हाला दाखवतो, असेही तो माफी मागताना म्हणाले.