महाराष्ट्रराजकारण

कंगनाला जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?- उर्मिला मातोंडकर

कंगना रणावत सध्या चांगलीच चर्चेत आहे. मुंबईबद्दल केलेले वक्तव्य तिच्या चांगलेच अंगलट आले आहे. मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतबद्दलचा संताप वाढत चालला आहे. आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर कंगनाला दिलेल्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून संतापली आहे. जनतेच्या पैशातून तिला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी, असा सवाल तिने केला आहे. उर्मिलाने आज एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कंगनाचा समाचार घेतला.

या मॅडमला काय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देते? तुमच्या आमच्यासारखा माणूस जो ‘अँक्ट ऑफ गॉड’ म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. त्या करदात्यांच्या पैशातून हिला काय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली, ती काय म्हणून दिली गेली?’ अशी विचारणाच उर्मिलाने केली आहे.

इंडस्ट्रीतल्या ड्रग माफियांची माहिती अंमली पदार्थ विभागाला देण्याचा दावा तिने केला होता. मुंबईसारख्या ‘भयाण’ ठिकाणी न येताही ती तू इंटरनेट, फोन, मेलवरून देऊ शकली असतीस. मग आलीस कशाला? चिथवायला, अशा शब्दांत उर्मिलाने संताप व्यक्त केला. यामुळे आता हे प्रकरण वाढतच चालले आहे. कंगना सध्या हिमाचल प्रदेशला माघारी गेली आहे.