महाराष्ट्र

भीमा-कोरेगावला जाणारच- प्रकाश आंबेडकर

टिम Newslive मराठी: भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत्या १ जानेवारी रोजी आम्ही जाणार असून आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी दिली जाणार नाही असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसापूर्वीच म्हटले होते. आज अहमदनगर दौऱ्यावर आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी दिलीप कांबळे यांचे नाव न घेता आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असं म्हटलं आहे.

आम्हाला रोखण्याची भाषा करणारा सामाजिक न्याय राज्यमंत्री हा बिनडोक आहे. किंबहुना राखीव जागांवरील भुंकणारी कुत्री आहे, त्यांना जे सांगितले ते तेवढेच कामं करत असतात, अशी टीकाही आंबेडकरांनी कांबळे यांच्यावर केली.

पाच राज्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विजयाने पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे आत्मे पुन्हा जागे झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसने भाजप विरोधातील सर्वांशी संवाद वाढवला पाहिजे. देशात भाजपविरोधात वातावरण असून आज देशात निवडणुका झाल्यास भाजपला दोनशेच्या आत लोकसभेच्या जागा मिळतील, असा दावाही आंबेडकरांनी केला.