तंत्रज्ञानमहाराष्ट्र

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत करणार मोठा बदल; नितीन गडकरींची नवी योजना

देशात प्रदूषण वाढवणाऱ्या गाड्या वाढल्या आहेत. यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करणे आवश्यक आहे. परिणामी नागरिक खासगी वाहनांचा वापर कमी करीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतील. सार्वजनिक वाहतुकीच्या वाढत्या महासाथीच्या दरम्यान नितीन गडकरी यांनी सांगितले की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं आधुनिकीकरण करण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये अधिकतर CNG, इलेक्ट्रिक वाहने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सहभागी केल्याने प्रदूषण कमी करता येऊ शकतं.

ज्यामुळे इंधनामध्येही बचत होईल. गडकरी म्हणाले की, यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या खर्चात बचत करता येईल. त्यांनी रिन्यूबल एनर्जी आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापरावर जोर दिला. गडकरी यांनी सांगितले की अशा वाहनांच्या वापरामुळे कच्च्या तेलाच्या आयातीतही घट होईल.

नितीन गडकरींनी सांगितले की नागपूरमध्ये 450 बसेसना बायोफ्लूयमध्ये बदलण्यात आलं आहे. आतापर्यंत 90 बसेस बायोफ्यूलमध्ये बदलण्यात आली आहे. बसेसमध्ये इंधनाचा वापर केल्यामुळे वर्षाला तब्बल 60 कोटी रुपयांची गरज असते. मात्र अशा बसेस CNG मध्ये बदलता येऊ शकते. सोबतचं सांगितले की सीवेजच्या पाण्यातून सीएनजी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे आता प्रदूषण रोखण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो