Newslive मराठी- मराठवाड्यातील आत्ताच्या पिढीने येथे बाराही महिने दुष्काळ पाहिला आहे.
परंतू आता मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात जलयुक्त शिवारची कामं झाली नसती तर आत्तापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला असता.
जलयुक्तमुळे विहिरींना पाणी राहिलं त्यामुळे ग्रामीण भागात टँकरवीना बराच काळ पाणी पुरु शकलं. शेतीची उत्पादकताही वाढली. कमी पावसातही मोठं नुकसान झालं नाही, हे जलयुक्त शिवारचं यश आहे.
तसेच हा आमचा संकल्प असून यासाठी वाट्टेल ते करू. असंही ते म्हणाले.
बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi