आंतरराष्ट्रीय मनोरंजन

‘या’ अभिनेत्रीसोबत डेट करण्याची तुमची इच्छा आता होणार पूर्ण

Newslive मराठी-  बॉलिवूडमधील अभिनेत्री  दिशा पटाणी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. तिला डेट करण्याचं स्वप्न अनेक मुलं पाहत असतात. दिशाच्या चाहत्यांनी अनेकदा ही ईच्छा सोशल मीडियावर दिशा समोर व्यक्त केली आहे.

आता दिशाच्या चाहत्यांची ही ईच्छा पूर्ण होणार आहे. दिशा तुमच्यासोबत डेट करु शकते आणि ते सुद्धा वर्षाच्या सर्वात रोमँटिक दिवशी अर्थात ‘व्हॅलेन्टाईन डे’ या दिवशी तुम्ही दिशासोबत डेट करु शकता.

माझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिक आहे- ताहिरा कश्यप

अभिनेत्री दिशा पटाणीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं आहे की, व्हॅलेन्टाईन डेला ती आपल्या चाहत्यांमधील एका कुणाला तरी डेट करणार आहे. त्यासाठी त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत एक व्हिडीओ अपलोड करत सांगावे लागेल की, ते का दिशासोबत डेट करण्यास ईच्छुक आहेत. दिशाने व्हिडीओमध्ये विशेष करुन सांगितलं आहे की, पाठवण्यात येणाऱ्या व्हिडीओमध्ये एकही ‘चीजी लाईन्स’ नसावी.

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध

या अभिनेत्रीसोबत अक्षय कुमार जायचयं डेटवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *