महाराष्ट्रराजकारण

आपण काँग्रेसमध्ये परतणार नाही- नारायण राणे

Newslive मराठी- आपण काँग्रेसमध्ये परतणार नसून अगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

देशात २०१४ साली भाजपसाठी जे वातावरण होते ते वातावरण आता राहिले नाही. त्यावेळी मोदींची हवा होती. आता परिस्थिती बदलेली आहे. भाजपला महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभेच्या जागा मिळतील आणि केंद्रात २००च्या जवळ त्याची संख्या असेल.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना युती झाली तर आपला मार्ग मोकळा आहे. मी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे. महाराष्ट्रात माझे उमेदवार असतील. असंही राणे यावेळी म्हणाले.