इंदापूरमहाराष्ट्र

लॉकडाऊनच्या मोकळ्या वेळेत वृक्षारोपण करून तरुणांनी ठेवला इतरांसमोर आदर्श!

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सणसर या गावातील तरुणांनी लॉकडाऊनच्या काळात एक समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतला आहे. या तरुणांनी गावातील शाळेच्या आवारात एक आठवण म्हणून वडाची झाडे लावली आहेत. निखिल निंबाळकर, गणेश निंबाळकर, परेश जगताप, सागर गायकवाड, तुषार जगताप, विशाल जगताप, अक्षय हिंगे, शंभुराज साळुंखे या तरुणांनी वृक्षारोपण केले आहे.

यामध्ये त्यांनी वडाची झाडे लावली आहेत. वडाच्या झाडाला म्हणतात अनेक वर्षे मरण नसते यामुळे या तरुणांनी या झाडाची निवड केली. सध्या पृथ्वीचा समतोल बिघडला आहे. निसर्गचक्र राहिलेले नाही. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यामुळे झाडे लावली पाहिजेत. त्यामुळे या तरुणांच्या कामाचे गावात कौतुक होत आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी आहेत. यामुळे या तरुणांनी विचार केला या वेळेचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे. आणि त्यांनी झाडे लावण्याचा निर्णय घेतला. सणसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात त्यांनी ही झाडे लावली. वडाचे झाड अनेक वर्ष टिकते म्हणून याची आठवण देखील राहणार आहे. सर्वांनी वृक्षारोपण करून निसर्ग टिकवला पाहिजे असे यावेळी या तरुणांनी सांगितले.