खेळमहाराष्ट्र

तुमचं नाव आणि काम दोन्ही विराट; मोदींकडून विराटच कौतुक

फिट इंडिया मोहीमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मोदींनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची प्रचंड प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुमचं तर नाव आणि काम दोन्हीही विराट आहे. तसेच कोहलीला त्याच्या फिटनेस रूटिनबाबत अनेक प्रश्न विचारले. त्याबाबत उत्तर देताना कोहली म्हणाला की, ‘फिट इंडिया मोहिमेचा फायदा सर्वांनाच होत आहे.

खेळाची गरज फार वेगाने बदलत आहे आणि आपण त्यांना पूर्ण करू शकत नव्हतो. आपण त्या फिटनेसमुळे फार मागे पडलो होतो. त्यामुळे मला वाटतं की, फिटनेसचं प्राथमिकता असली पाहिजे. आज फिटनेस सेशन मिस झाल्यामुळे वाईट वाटतं.’

फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि पॅरालिंपियन देवेंद्र झाझरिया यांच्यासोबत चर्चा केली. या ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये मॉडेल, रनर आणि अभिनेत्रा मिलिंद सोमण, प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर हेदेखील सहभागी झाले होते. सर्वांनी फिटनेसबाबत आपला प्रवास आणि पंतप्रधानांच्या निरोगी जीवनातील गुणांबद्दल आपली मतं मांडली आणि काही सूचनाही दिल्या.