आंतरराष्ट्रीयखेळ

युवराज सिंगची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Newslive मराठी – क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

युवराजने 18 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय आज मुंबईतील पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.

यावेळी त्याने सर्वांचे आभार मानले. युवराजने 40 कसोटी सामने खेळले. यात त्याने 1900 धावा केल्या. तर 304 वनडेत 8701 धावा केल्या. तर एकूण 58 टी-20 सामन्यात 1177 धावा केल्या.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi